भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी असे नम्र आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल पाटील यांनी केले आहे. भाजपाच्या दुसऱ्या यादीत भिवंडीमधून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे उमेदवारी मिळाली. गेल्या ७७ वर्षांपैकी गेल्या १० वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी ३५ हजार कोटी रुपयांची कामे झाली. अनेक कामे पूर्ण असून, काही प्रगतीपथावर आहेत. भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सुनियोजित पद्धतीने विकासाबरोबरच चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading