विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीतर्फे १०५ शिक्षकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून हे शिक्षक पुरस्कार दिले जात आहेत. यंदा या पुरस्काराचं द्वितीय वर्ष आहे. कोकणातील उपक्रमशील, सर्जनशील, प्रयोगशील शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यानुसार १०१ वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, ३ संस्था चालकांना आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कार आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी वाहून घेतलेल्या एका व्यक्तीला वसंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे.