तांब्याच्या धातूचे बॉल चोरी करणा-या तिघांना अटक

तांब्याच्या धातूचे बॉल चोरी करणा-या तिघांना पोलीसांनी जेरबंद केलं असून त्यांच्याकडून २ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या धातूचे बॉल जप्त केले आहेत. एमेक्स सिस्टीम इंटरनॅशनल कंपनीचे दापोडा येथे गोदाम आहे. या गोदामातून २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी टॉयलेटच्या खिडकीची जाळी तोडून आत प्रवेश केला आणि आतील २ लाख ५३ हजारांचे ३६ हून अधिक तांब्याच्या धातूचे बॉल चोरून नेले. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक मयुर पवार यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी तपास केला आणि जवळील सीसीटीव्हीचे फूटेज पाहून अक्षय पाटील, किशोर पाटील आणि नरेंद्र मिश्रा अशा तिघांना अटक केली. यांच्याकडे चौकशी केली असता अक्षय आणि किशोर पाटीलने हे बॉल चोरून नरेंद्र मिश्रा यांना विकल्याचं निष्पन्न झालं. नरेंद्र मिश्राकडून २ लाख ३२ हजार किंमतीचे तांब्याचे बॉल जप्त करण्यात आले. याप्रकरणी नारपोली पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading