भारतीय जनता पक्ष आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे विविध जनयोजना तसंच नवीन मतदार नोंदणी शिबीराचं आयोजन

भारतीय जनता पक्ष आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध जनयोजना, आरोग्य योजना तसंच नवीन मतदार नोंदणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या म्हणजे १ मार्च रोजी हे शिबीर सरस्वती मराठी शाळेसमोरील धैर्य सोसायटीत आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ज्येष्ठ नागरिक योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, विविध रूग्णांसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमदान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. तसंच नवीन मतदार नोंदणी आणि जुन्या मतदार नोंदणीमध्ये दुरूस्ती हे या शिबीराचं आकर्षण आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading