महापालिका मुख्यालयामधील सर्व विद्युत व्यवस्थेची तपासणी करण्याचे उपायुक्तांचे आदेश

महापालिका मुख्यालयामधील सर्व विद्युत व्यवस्थेची तपासणी करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी विदयुत कामं करणं आवश्यक आहे ती तातडीनं पूर्ण करावीत असे आदेश महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उपायुक्तांनी विद्युत नगर विभागाच्या उपनगर अभियंत्यांना दिले आहेत. अलिकडेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी शहर विकास विभागाचे आगीच्या भीतीपासून संरक्षण करण्याची विनंती पालिका आयुक्तांकडे केली होती. महापालिका मुख्यालयात चौथ्या मजल्यावर शहर विकास विभाग हा महत्वाचा विभाग असून तो महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. या विभागामध्ये महत्वाची कागदपत्रं असून काही जनहित याचिकेची कागदपत्रंही या विभागात आहेत. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीस ३३ वर्ष झाली असून दुर्दैवानं आग लागण्यासारखी घटना घडल्यास शहर विकास विभागातील सर्व फाईल्स नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळं महापालिका मुख्यालयातील सर्व विदयुत कामं तातडीनं पूर्ण करावीत आणि मुख्यालय इमारतीमध्ये आग लागणार नाही यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading