ठाण्यातील बन्सल हॉस्पिटलमध्ये मणके विकारांवर आयुर्वेदीक उपचार आणि मार्गदर्शन शिबीराचं आयोजन

ठाण्यातील बन्सल हॉस्पिटलमध्ये मणके विकारांवर आयुर्वेदीक उपचार आणि मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या म्हणजे १ मार्च रोजी सकाळी १२ ते दुपारी ३ या वेळेत मणक्यांच्या विकारांवर हे उपचार शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात मणक्याचे, पाठीचे, मानेचे विकार, स्पाँडीलायटिस, स्लीप डिस्क, नस दबली जाणे, खांदा जखडणे, हातापायांना मुंग्या येणे, बधीर होणे, पाठीत, कमरेत चमक येणे यासारख्या विकारांवर तसंच आमवातावर आयुर्वेदीक पध्दतीने मर्म आणि अग्निकर्म उपचार केले जाणार आहेत. नाव नोंदणीसाठी ९९६७५ ६७७७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading