लोकसभेची मतमोजणी सुरू असून या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्यामुळे ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. भारतीय जनता पक्षाला आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ३४५ जागांवर आघाडी असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष आत्तापासूनच सुरू केला आहे. ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या खोपट येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी जय श्रीरामच्या घोषणा देत हा जल्लोष साजरा केला. यावेळी पक्षाच्या शहराध्यक्षांसह आमदार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.