ब्रास बँड वाद्याची ओळख ठाण्यानं आजही जपली असल्याचा सार्थ अभिमान – महापौर

आजच्या आधुनिक डीजेच्या काळातही ब्रास बँड या वाद्याने आपली एक ओळख टिकवून ठेवली आहे. आजही बेन्जो, डीजेच्या काळात देखील मंगलसमयी ब्रास बँड पथकाला आमंत्रित केल जाते. ब्रास बँडची सुरूवात ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यातून झाली असून ही परंपरा ठाण्यानं आजही जपली असल्याचा सार्थ अभिमान असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ब्रास बँड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणा-या हनुमान बँड या पथकास ५० हजार रूपये, द्वितीय क्रमांक पटकावणा-या भैरवनाथ बँड पथकास ४० हजार रूपये तर तृतीय क्रमांक पटकावणा-या राष्ट्रीय बँड पथकास ३० हजार रूपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून साई चेरोबा बँड आणि सुभाष बँड या पथकांना प्रत्येकी २० हजार रूपयांची उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली तर श्रीकृष्ण बँडला उत्कृष्ट क्लॉरनेटसाठी, भैरवनाथ बँडला उत्कृष्ट रिदम आणि ट्रम्पेटसाठी, राष्ट्रीय बँडला सेक्साफोनसाठी आणि हनुमान बँडला उत्कृष्ट मास्तरसाठी प्रत्येकी ७ हजार रूपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading