डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पाईपद्वारे गॅस घराघरात

डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पाईपद्वारे गॅस घराघरात पोहचवण्याचं काम झालं आहे. एमआयडीसी परिसरात रहिवासी क्षेत्रात दुसरी पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण झालं असून या परिसरातील डोंबिवली जिमखान्यापर्यंत घराघरांत गॅस पोहचवण्यास खासदार श्रीकांत शिंदे यांना यश आलं आहे. पुढचं काम सुरू होत नव्हते म्हणून शिंदे यांनी चौकशी केली असता कल्याण-डोंबिवली महापालिका रस्ते खोदण्यास परवानगी देत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता महापालिकेनंही आता महानगर गॅससाठी रस्ता खोदण्यास परवानगी दिली आहे. डोंबिवलीमध्ये घराघरात गॅस पुरवठा सुरू व्हावा म्हणून महानगर गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत शिंदे यांनी बैठक घेतली. त्यामुळं आता एका बाजूने घारडा सर्कल ते मंजुनाथ शाळा आणि पुढे डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत महानगरचा गॅस पोहचणार आहे. डिसेंबर २०२० पर्यंत गॅस पुरवठा सुरू होईल असं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading