बॉलिवुड थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर उघड करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

घोडबंदर रोडवरील जुने ठाणे, नविन ठाणे आणि रूणवाल प्लाझा पाठीमागे असलेल्या बॉलिवुड थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर उघड करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. हे दोन्ही थीम पार्क सरनाईक यांच्या मतदारसंघात असून असे थीम पार्क व्हावे यासाठी प्रशासनाला त्यावेळी पत्रही दिले होते. एखाद्या ठेकेदाराच्या चुकीमुळे किंवा महापालिकेतील अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे काही एैतिहासिक स्थळांचं प्रतिबिंब दर्शविणा-या थीम पार्कची होत असलेली दुर्दशा बघून दु:ख होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आहे. ठाणेकरांच्या कररूपी पैशातून ठेकेदाराने नियमाप्रमाणे पुर्ण काम केले नसतानाही ठेकेदाराने खोटी आणि चुकीची बिले देऊन ती बिले अदाही करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही थीम पार्कची दुर्दशा झाली आहे. राज्य शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबविले. त्यामध्ये समतानगर येथील ज्येष्ठ नागरीक भवन, वर्तकनगर येथील प्रभाग समिती कार्यालय, वेदांत कॉम्प्लेक्स समोरील खुला रंगमंच, वर्तकनगर येथील निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय, लोकमान्यनगर येथील चिंतामणी आनंद दिघे रूग्णालय, त्या शेजारी असलेले महिला बचत गट भवन, रामचंद्र ठाकूर तरण तलाव, शिवाईनगर समोरील खुला रंगमंच, उपवन येथील अँम्पी थिएटर, बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाट, बेथनी हॉस्पिटल समोरील तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, पोखरण रोड नं. २ वरील निसर्ग उद्यान, येऊर येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची अद्ययावत शाळा, गायमुख येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटी, तसेच समतानगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, पवारनगर, पोखरण रोड नं. २ आणि घोडबंदर रोड येथे वेगवेगळ्या नऊ उद्यानांची निर्मिती केली. आपल्या मतदारसंघातील घोडबंदर रोडवरील जुने ठाणे, नविन ठाणे आणि रूणवाल प्लाझा मागील थीम पार्कच्या कामामध्ये ठेकेदार आणि महापालिकेतील काही वरिष्ठ अधिका-यांच्या चुकांमुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर विरोधकांकडून या थीम पार्क बद्दल आरोप होत असतील तर ते  सहन करणार नाही. त्याकरीता थीम पार्कचा चौकशी अहवाल हा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जाहिर करावा, अन्यथा विधिमंडळाच्या येणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानाही या दोन्ही थीम पार्क संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चा घडवून आणावी लागेल असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading