बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिला ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं

ठाण्यातील विटावा परिसरात राहणारी बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिनं राष्ट्रीय इक्विप्ड क्लासिक बेंचप्रेस स्पर्धेतील ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते. ठाण्यातील कारभारी जिमच्या सुश्मिता देशमुख हिनं ४३ किलो वजनी गटात दोन्ही स्पर्धेतील आधीचे विक्रम तोडून २ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सुश्मिता देशमुख हिनं केरळमधील नॅशनल ज्युनियर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक, दुबईतील इंटरनॅशनल बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्णपदक तसंच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ५ सुवर्णपदकांसह ४९ पदकांची कमाई केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading