पंडीत राम मराठे संगीत महोत्सव ६ डिसेंबर पासून

शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणारा प्रतिष्ठेचा असा पंडीत राम मराठे संगीत महोत्सव ६ डिसेंबर पासून सुरू होत आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली. ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे पंडीत राम मराठे स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संगीत समारोहाचं उद्घाटन राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात विवेक सोनार यांच्या बासरी वादनानं होणार आहे. तर प्रख्यात गायक रशिद खान यांच्या गायनानं पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप होणार आहे. शनिवारच्या सत्राची सुरूवात दीपा पराडकार यांच्या गायनानं, श्रध्दा शिंदे यांच्या कथ्थक नृत्यानं होणार आहे. त्यानंतर यशश्री कडलासकर आणि रमाकांत गायकवाड यांचं शास्त्रीय गायन होणार आहे तर या सत्राचा समारोप राजेंद्र गंगाणी यांच्या कथ्थक नृत्यानं होणार आहे. रविवारी पंडीत वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वसंत वैभव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी स्वरांगी आणि प्राजक्ता मराठे यांचं गायन होणार आहे. तर या कार्यक्रमाचा समारोप डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानं होणार आहे. या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी एक तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading