बाळकूममध्ये मेडीकलमध्ये छापा टाकून परवाना नसलेल्या सॅनिटायझर्सच्या बाटल्या जप्त

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच काही मंडळी आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. एकीकडे बाजारात सॅनिटायझर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत तर दुसरीकडे बनावट सॅनिटायझरही बाजारात दिसत आहेत. काल अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी बाळकूम पाडा नंबर २ येथील आर के मेडीकलमध्ये छापा टाकून परवाना नसलेल्या सॅनिटायझर्सच्या २३ बाटल्या जप्त केल्या. या बाटल्या कुठून आणल्या याचा सध्या अन्न आणि औषध प्रशासनातर्फे शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading