नौपाडा परिसरात कार्यालयात घुसून एका बांधकाम व्यावसायिकावर हल्ला

ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनीतील कार्यालयात घुसून एका बांधकाम व्यावसायिकावर त्रिकुटाने लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. बांधकाम व्यावसायिकांमधील चढाओढीमुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. नवी मुंबईत राहणारे ऋषीकेश दंडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे ठाण्यातील भास्कर कॉलनीत सुखकर्ता इमारतीत कार्यालय आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते एकटेच आपल्या कार्यालयात बसलेले असताना अचानक एका त्रिकुटाने त्यांच्यावर लोखंडी रॉडच्या सहाय्यानं हल्ला चढवला. त्यांना धमकावत मारहाण करून त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. दंडे यांनी आरडाओरड केल्यानं इमारतीचा सुरक्षा रक्षक धावून आल्यानं हल्लेखोरांनी धूम ठोकली. सध्या नौपाडा पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading