बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुंबई विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेल्य शैक्षणिक पुरस्कार वितरण समारंभात बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. डॉ. गोस्वामी-गिरी यांच्या शिकवण्याच्या नवनवीन कल्पना, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांची चिकाटी, नाविन्यपूर्ण संशोधन आणि उपक्रम अशा विविध गुणांकरता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading