प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्सून कालावधीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत आणि बचावकार्य कसे करावे याचे प्रशिक्षण सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला अवगत असणे आवश्यक असल्याने या शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बृहन्मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र लोखंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयांबाबतचे प्रशिक्षण दिले. या शिबीरात महापालिकेचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी आणि कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, प्रभाग समिती अधिकारी-कर्मचारी तसेच, ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading