वागळे इस्टेटमधील अंबिका नगरमध्ये काल रात्री मोठी आग

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील अंबिका नगरमध्ये काल रात्री मोठी आग लागली होती. ही आग लागल्याने या परिसरात मोठी घबराट निर्माण झाली होती. वागळे इस्टेट रोड नंबर २९ येथील ७ गाळ्यांमध्ये ही आग लागल्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एका गाळ्यात असलेल्या एलपीजी सिलेंडरचे स्फोट उडत होते त्यामुळे घबराट निर्माण झाली होती. सिलेंडरचा आवाज खूप मोठा होत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्रीच्या वेळी संपूर्ण अंबिका नगर खाली करण्यात आलं होतं. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, पोलीस या सर्वांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केलं. ही आग इतकी भीषण होती आणि त्यातच सिलेंडरचे स्फोट झाल्याने सुरूवातीला ही आग विझवणं काहीसं कठीण झालं होतं. मात्र ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं. दरम्यानच्या काळात सुरक्षिततेचा उपाय म्हणून अंबिकानगरचा संपूर्ण वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. सुदैवानं या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading