पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या टोळीला नौपाडा पोलीसांनी जेरबंद केलं आहे. काल हाऊस ऑफ मोमोज या हॉटेलमधून एक जण पार्सल घेऊन गेला. नंतर संध्याकाळी या मोमोज मध्ये स्टेपलरची पिन टाकून ३ बनावट पोलीस या हाऊस ऑफ मोमोज मध्ये आले आणि त्यांनी मालकाला आम्ही पोलीस असून आमच्याकडे तुमच्या मोमोज मध्ये स्टेपलरची पिन मिळाल्याची तक्रार आली आहे. त्यामुळं आम्ही तुम्हांला अटक करण्यास आलो असल्याचं सांगून तेथील नोकरास बेड्या घातल्या. तुम्हांला जर ही कारवाई नको असेल तर २० हजार रूपये देण्याची मागणी त्यांनी मालकांकडे केली. यावरून हॉटेल मालकास संशय आला आणि त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेच्या तावडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलीस उपनिरिक्षक विनोद लबडे यांच्यासह मोमोजकडे धाव घेतली. दुकानाबाहेर पोलीसांची गाडी बघून या बनावट पोलीसांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस पथकातील लबडे, अहिरे आणि इतरांनी या चौघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading