जाग संस्थेतर्फे ठाण्यातील सर्व नगरसेवकांचं लवकरच प्रगतीपुस्तक

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक जाग या संस्थेतर्फे केलं जाणार आहे. शहरातील नागरी प्रश्नांवर काम करणा-या कार्यकर्त्यांसाठी नागरी अधिकार कार्यशाळेचं आयोजन जागनं केलं होतं. या कार्यशाळेत जागचे संस्थापक प्रदीप इंदुलकर यांनी महापालिकेतील १३१ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवकांच्या गेल्या २ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारे प्रगतीपुस्तक मांडण्याचा प्रस्ताव सादर केला. कोणताही पूर्वग्रह न ठेवता, कोणताही पक्षीय भेदाभेद न करता निरपेक्ष बुध्दीनं जाग हा प्रकल्प राबवत आहे. यात माहितीचा अधिकार वापरून आपला कोणताही दृष्टीकोन न मांडता केवळ सत्य आकडेवारी मांडण्याबरोबरच त्या त्या प्रभागातील मतदाराचे आपल्या नगरसेवकाबाबतचे मत आणि त्या नगरसेवकाचंही मनोगत मांडलं जाणार आहे. या कार्यशाळेचं उद्घाटन अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांच्या हस्ते झालं. या कार्यशाळेमध्ये माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तर संजय मं.गो. यांनी जागनं छेडलेल्या विविध आंदोलनांची माहिती यावेळी दिली. सर्वांच्या सहभागाने सर्वांचा विकास हे सूत्र घेऊन पुढे जाण्याचे जागचे धोरण असल्याचं संजय मं. गो. यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading