पोलीसांना कोरोना प्रतिबंधासाठी होमीओपॅथीक गोळ्यांचे वाटप

कोरोनाच्या लढाईत अहोरात्र राबणा-या पोलीसांच्या सुरक्षेसाठी शासनातर्फे होमिओपॅथिक औषधाच्या गोळ्याचं वाटप करण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करत असलेले पोलीस, होमगार्डस, राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनियम अल्बम या होमीओपॅथीक औषधाच्या तब्बल 22 हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले. भविष्यात 50 हजार बाटल्या तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडुन देण्यात आली.
ठाणे पोलीस दलातील योद्धांसाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सरकारमार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिस बांधवांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, त्यांची प्रतिबंधात्मक शक्ती वाढावी तसेच शारीरिक क्षमता टिकून राहावी यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार अर्सेनियम अल्बम या 22 हजार होमिओपॅथी औषधी गोळयांचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading