पोलीसांची निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याची आमदार संजय केळकर यांची विधानसभेत मागणी

पोलीसांची निवृत्ती वयोमर्यादा ५८ वरून ६० करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. विधानसभेमध्ये औचित्याद्वारे वयोमर्यादेबाबत प्रश्न उपस्थित करताना केळकर यांनी ही मागणी केली. शासनानं कंत्राटावर पोलीस नेमण्याबाबत विचार चालवला आहे. त्यावर बोलताना केळकर यांनी ही मागणी केली. पोलीस उपअधिक्षकापर्यंत वयोमर्यादा ही ६० आहे. मात्र त्याखालील अधिकारी-कर्मचा-यांची निवृत्ती वयोमर्यादा ही ५८ आहे. त्यामुळं शासनानं ही मर्यादा ६० पर्यंत वाढवावी आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. जे सक्षम असतील ते राहतील, अन्यजणांना हवी असेल तर निवृत्ती मंजूर करावी अशी मागणी संजय केळकर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading