पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काढणार सायकल मोर्चा

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर सायकल मोर्चा काढणार आहेत. येत्या गुरूवारी हा मोर्चा काढला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज दरात बदल करत आहेत. पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून लूट केली जात आहे. रोज दरवाढ करण्यापेक्षा तीन महिन्यातून एकदा दरामध्ये फरक करावा, पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू आणि सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पंतप्रधानांना याबाबत आंदोलनाची निवेदनं पाठवूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळं आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर सायकल चालवत धडक मोर्चा नेला जाणार आहे. प्रदेश कार्यालयात माजी मुख्यमंत्र्यांसह विविध पदाधिका-यांची भेट घेऊन त्यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव आणावा अशा आशयाचं निवेदन दिलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading