पाळीव कुत्र्याने घरासमोर केलेल्या विष्ठेवरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार घडला आहे. बाळकूम येथील राम मारूती नगर येथे सुलोचना शिंदे आणि त्यांचे सख्खे दिर दत्तात्रय शिंदे शेजारी शेजारी राहतात. दत्तात्रय शिंदे यांनी पाळलेल्या दोन कुत्र्यांपैकी एका कुत्र्यानं सुलोचना शिंदे यांच्या घरासमोर विष्ठा केल्यानं त्याचा जाब दिराना विचारला. त्यावरून दत्तात्रय आणि त्यांच्या दोन मुलांनी सुलोचना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. मात्र याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.