गेले चार-पाच दिवस जिल्ह्यामध्ये सरासरी १०० मिलीमीटर पाऊस

गेले काही दिवस पावसानं चांगलाच जोर धरला असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणी टंचाईची टांगती तलवार दूर होऊ शकते. गेले चार-पाच दिवस जिल्ह्यामध्ये सरासरी १०० मिलीमीटर पाऊस होत आहे. गेल्या २४ तासातही जिल्ह्यात सरासरी ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २०० मिलीमीटर पाऊस भिवंडीत तर सर्वात कमी म्हणजे ५५ मिलीमीटर पाऊस मुरबाडमध्ये झाला आहे. ठाणे १०२, कल्याण ९१, उल्हासनगर ६०, अंबरनाथ ५८ तर शहापूरमध्ये १०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या जून पासून १ जुलैपर्यंत साधारणपणे ७ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र याच काळात ४ हजार ३१५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस ४१४ मिलीमीटरने कमी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading