पांचपाखाडी भागात वृक्ष कोसळल्यामुळं 2 चार चाकी आणि 3 तीनचाकी गाड्यांचं नुकसान

ठाण्याच्या पांचपाखाडी भागात एक मोठा वृक्ष कोसळल्यामुळं दोन चार चाकी आणि तीन तीनचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे. पाचपाखाडीतील सरस्वती शाळेजवळील केसरी बंगल्याजवळ असलेला मोठा वटवृक्ष उन्मळून पडला. हा वृक्ष उन्मळून पडताना तो झाडाखालील गाड्यांवर पडल्यामुळं या गाड्यांचं नुकसान झालं आहे. यामध्ये मंगेश खराटकर यांची वॅगन आर, जितेंद्र गुप्ते यांची बलेनो, अजीत चौधरी यांची यामाहा फायझर, सुनीता बैत आणि शिल्पा पाटील यांची होंडा ॲक्टीव्हा या गाड्यांचं नुकसान झालं आहे. ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षानं त्वरीत धाव घेऊन पडलेला वृक्ष बाजूला करून रस्ता मोकळा केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading