दहीहंडी उत्सवासाठी बाजारात आकर्षक हंड्या – मात्र कोरोनामुळे ग्राहकांची पाठ

यंदा सर्वच उत्सवांवर कोरोनाचं सावट असून गोकुळाष्टमीवरही कोरोनाचं सावट आहे. दहीहंडी म्हटलं की ठाण्यात उत्साहाचं वातावरण असतं. अगदी आदल्या दिवशीपासून दहीहंडी उभारण्याचा विविध मंडळांचा प्रयत्न असतो. पण यंदा मात्र कोरोनामुळे या उत्सवावर अनेक बंधनं आली आहेत. त्यामुळं यंदा सार्वजनिक दहीहंडी उत्सव जवळपास रद्द झाल्यातच जमा आहे. बाजार मात्र दहीहंडी उत्सवासाठी लागणा-या रंगीबेरंगी आकर्षक हंड्यांनी भरून वाहत आहे. आकर्षक रंगसंगतींनी रंगवलेल्या हंड्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या हंड्यांना फारसा खरेदीदार नाही त्यामुळं बाजारात उठावही दिसत नाही. लहान हंड्या काही मंडळी खरेदी करताना दिसत आहेत. घरातल्या घरात हंडी फोडण्यासाठी म्हणून आपल्या लहान मुलांसाठी अशा हंड्या खरेदी केल्या जात आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading