पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश मिळालं आहे.

पुणे-नाशिक प्रमाणे ठाण्यातही दुचाकी जाळण्याचा प्रकार वाढले असून गेल्या आठवड्यात तीन दुचाकी जाळण्याचे प्रकरण ताजे असतानाच काल पाचपाखाडी मध्ये अठरा  दुचाकींना आग लावण्यात आली. एकाच वेळीस 18 दुचाकी जाळण्याचा ठाण्यातला हा पहिलाच प्रकार असून यामुळे खळबळ उडाली होती. महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन आणि त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अठरा गाड्यांना आग लावण्यात आल्यामुळे या गाड्या भस्मसात झाल्या. पांचपाखाडितील शिवसेना शाखे समोरील हनुमान सोसायटीतील संजय सिंग यांच्या गाळ्याला आग लागली. या गाड्या गाड्या समोरच उभ्या करून ठेवल्या होत्या. या दुचाक्या या आगी मध्ये लपटला गेल्या. यामध्ये रविप्रकाश दीक्षित आणि प्रशांत भोईर यांची होंडा पॅशन, राजेश यादव यांची होंडा शाइन, महेंद्र मोर्या यांची बजाज सिटी, पांडुरंग पाटील, चंद्रकांत यादव, निखिल मोरे, अमित पवार, राखी खटाटे आणि नरेंद्र मालुसरे यांच्या ॲक्टीव्हा, अनिल दिवेकर यांची ॲचिवर, यांची ॲक्टीव्हा दुचाकी या आगीत भस्म झाली. एकाच वेळी १८ गाड्या जाळल्यामुळे पोलीसही हैराण झाले. पोलीसांनी केलेल्या तपासात गौरव पालवी या युवकाला अटक करण्यात आली. त्यानं क्षुल्लक कारणावरून इशा पॉवर लॉण्ड्रीचे मालक प्रशांत भोईर यांची दुचाकी जाळली. पण या गाडीच्या भडक्यानं इतर गाड्याही भस्म झाल्या. पोलीसांनी या प्रकरणातील आरोपीला अवघ्या ८ तासात जेरबंद केलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading