परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंची जयंती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ’महिला सेना विधानसभा प्रमुख“ परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी विविध ठिकाणी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य हळदी-कुंकू समारंभाचा शुभारंभ लोकमान्यनगर येथील डवलेनगर मैदानात करण्यात आला. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सुहासिनी महिलांनी वाण देऊन हळदी-कुंकू लुटले. या कार्यक्रमात लकी-ड्रॉ द्वारे अनेक बक्षिसाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील वसंतविहार-पवारनगर, घोडबंदर रोड, शिवाईनगर-वर्तकनगर महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू समारंभ करण्यात येणार असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांना एकत्र आणून जास्तीत जास्त महिला उद्योजिका तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली असल्यामुळे हे आव्हान आपल्या सर्व महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने पेलण्याचा पर्यंत करणार आहे असे महिला सेना विधानसभा प्रमुख परिषा सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading