दर्जा वाढवण्यासाठी आता यांत्रिकी पध्दतीनं सफाई केली जाणार

महापालिका क्षेत्रामध्ये सध्या साध्या पध्दतीनं सफाई केली जात असून याचा दर्जा वाढवण्यासाठी आता यांत्रिकी पध्दतीनं सफाई केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारची यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील सिमेंटच्या रस्त्यांवर यांत्रिकी पध्दतीनं साफसफाई सुरू केली तर रस्ते स्वच्छ ठेवण्यास मदत होऊ शकते. जगामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे साफसफाई केली जाते. ठाणे महापालिका क्षेत्रात सफाईचं काम खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु सफाईचा दर्जा वाढवण्यासाठी आणि रस्त्यांची सफाई उत्तम करण्याकरिता महापालिका आयुक्तांनी कंबर कसली आहे. शहरातील रस्त्यांची सफाई आता यांत्रिक पध्दतीनं करण्यासाठी त्यांनी आदेश दिले असून त्यासाठी लवकरच यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading