परिवहन समिती सदस्याची नियमांनुसार निवड करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

परिवहन समिती सदस्य म्हणून नियमानुसार सदस्यांची निवड करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीच्या १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. परिवहन सदस्य म्हणून निवड करताना महापालिका अधिनियम १९४९च्या कलम २५ नुसार ज्यांना प्रशासनाचा किंवा परिवहनचा अनुभव असेल अथवा अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय, कामगार विषयक बाबतीत ज्यांची क्षमता दिसून आली असेल अशा व्यक्तींमधून परिवहन समितीची निवडणूक झाली पाहिजे. जर एखादी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदीनुसार अथवा अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास अनर्ह असेल तर ती व्यक्ती परिवहन सदस्य म्हणून नेमली जाण्यास अनर्ह असेल असं म्हटलं आहे. अधिनियमामध्ये या बाबी स्पष्ट केल्या असताना आत्तापर्यंत या नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली नसल्यामुळं परिवहन सेवेची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. याचा गांभिर्यानं विचार करून सदस्यांची नियमानुसार निवड करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading