पाचव्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मावळी मंडळ शाळेचं वर्चस्व कायम

श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे आयोजित पाचव्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मावळी मंडळ शाळेनं आपलं वर्चस्व कायम राखलं. बेडेकर विद्यालय, भगवती विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, न्यू कळवा स्कूल, मो. ह. विद्यालय अशा विविध ३० शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मावळी मंडळ शाळेनं १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत बाजी मारली. श्री मावळी मंडळच्या नेहा मोरे आणि सरस्वती विद्यालयाच्या श्रावणी पवार हिचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. मुलांच्या सामन्यात सरस्वती विद्यालयाचा संघ विजयी ठरला. सरस्वती विद्यालयाच्या गौरांग बेदी आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या निखिल मांढरे यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. १४ वर्षाखालील खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ संघानं सलग चौथ्या वर्षी विजेतेपद कायम राखले. श्री मावळी मंडळ शाळेच्या तनिष फाटे तर मो ह विद्यालयाच्या प्रणव कोळीला उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आलं. मुलींच्या गटात भगवती शाळेनं विजेतेपद पटकावलं. भगवती विद्यालयाच्या सानवी मोरेला उत्कृष्ट आक्रमक तर मावळी मंडळच्या वैष्णवी शेलारला उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading