पनवेल लोकलच्या खाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या एका तरूणीचे प्राण मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले

पनवेल लोकलच्या खाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या एका तरूणीचे प्राण मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचू शकले. पनवेल -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हि लोकल ट्रेन दुपारी २ च्या सुमारास वाशी स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघत असताना एक १८-१९ वर्षांची तरूणी अचानक ट्रॅकवर आडवी झोपल्याचं दिसलं. मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी प्रसंगावधान राखून इमर्जन्सी ब्रेकचा वापर करून ट्रेन सुरक्षितपणे तरुणीच्या जवळ थांबवली. हि तरूणी आत्महत्या करण्याच्या विचाराने ट्रॅकवर आली होती. कोन्नूर यांनी तीला धीर देऊन त्याच गाडीतील पहिल्या महीला डब्ब्यात बसवले. डब्ब्यातील इतर महीलांना तीची काळजी घेण्यास सांगून त्यांनी पुन्हा गाडी सुरू केली. मानखुर्द येथे पुन्हा तीची विचारपूस करून तीला सुखरूप घरी जाण्यासाठी समजावले. गाडी चालवण्याच्या मोटरमनच्या कार्यकुशलतेमुळे एका तरुणीचे प्राण वाचविण्यात यश आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading