सिंगल युज प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी मोहिमेतंर्गत 47 किलो प्लास्टिक कॅरी बॅग जप्त तर 15 हजार रुपये दंड वसूल

सिंगल युज प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी मोहिमेतंर्गत कोपरी, उथळसर आणि खोपट परिसरातील दुकानांमधून 47 किलो प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करून 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. केंद्र शासनाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास सिंगल यूज प्लॅस्टिकबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेच्यावतीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. एकदा वापर करुन टाकून देण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणास हानी निर्माण होत आहे. यासाठी सिंगल यूज प्लॅस्टिकचा साठा करुन विक्री करणाऱ्या दुकानदारांवर तसेच सर्व आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. ही मोहिम ठाण्यात अधिक तीव्र स्वरूपात राबविली जाणार आहे. ठाणे पूर्वतील कोपरी परिसर, स्टेशन रोड, कोपरी मार्केट परिसरातून सिंगल यूज प्लास्टीक बंदीच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईअंतर्गत दुकानांमधून 35 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून एकूण 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर उथळसर प्रभागसमितीअंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये उथळसर मार्केट, खोपट मार्केट परिसरातून 12 किलो प्लॅस्टिक कॅरी बॅग जप्त करुन 5 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यानंतरही सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर 5 ते 25 हजारांची दंडात्मक कारवाई आणि कारावास अशा प्रकारची कारवाई होवू शकते. यासाठी दुकानदारांनी आणि नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading