पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती

ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शेल्टर असोसिएटस संस्थेच्या माध्यमातून वस्त्यावस्त्यांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी पथनाट्य, लसीकरणासंदर्भात गाणी, पपेट शो, सापशिडी , चालता बोलता आदी खेळ कार्यक्रमांद्वारे करण्यात येत असलेल्या जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेत आहेत. महापौर नरेश म्हस्के, सावरकरनगर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता खाडे आणि शेल्टर संस्थेच्या संस्थापिका प्रतिमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात विविध ठिकाणी लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. ठाण्यातील जयभवानीनगर आणि आंबेवाडी भाजी मार्केट येथे 18 वर्षावरील नागरिकांसाठी ठाणे महापालिका आणि शेल्टर संस्थेच्या माध्यमातून लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन करताना वस्तीतील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहे अशा लोकांची यादी करुन एक दिवस आधी त्यांना कूपन देण्यात आले होते. तसेच ज्यांनी अद्याप एकही डोस घेतला नव्हता अशा नागरिकांचे घरोघरी जाऊन कोविन ॲपवर त्यांची नोंदणी करुन त्यांना लस देण्यात आली. शेल्टर संस्थेने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत असून अशाच पद्धतीने ठाण्यातील लोकमान्य सावरकर, माजिवडा, कोपरी, उथळसर या विभागात येणाऱ्या वस्त्यांचा समावेश असणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading