आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज कोरोनाविषयक फारसे निर्बंध नसल्यामुळे गणेश भक्तांना अंगारकीनिमित्त गणेशाचं दर्शन घेता आलं. धार्मिक स्थळं खुली करण्यात आल्यामुळं २७ जुलै प्रमाणे आज मात्र गणेश भक्तांना बंद दाराचं नव्हे तर मंदिराच्या आत जाऊन श्रीगणेशाचं दर्शन घेता आलं. ठिकठिकाणची गणेश मंदिरं आज अंगारकी चतुर्थी निमित्त खुली असल्यामुळं भक्तांच्या गणेश दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळत होतं. या वर्षातली ही शेवटची अंगारकी चतुर्थी होती.