पत्रकार प्रशांत सिनकर यांना ‘चौथा स्तंभ विशेष’ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

पत्रकारितेमध्ये विशेष कार्य केल्याबद्दल दिला जाणारा अप्रतिम मीडिया, पुणे यांचा ‘चौथा स्तंभ’ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक पत्रकार प्रशांत सिनकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पर्यावरण वृत्त गटात दिला जाणारा हा पुरस्कार पर्यावरण अभ्यासक पत्रकार प्रशांत सिनकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यमातील प्रतिनिधींचे नामांकन करण्यात आले होते. २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण आणि पुरस्कार तसेच निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष विजेते निवडताना लावण्यात आले होते. पत्रकार प्रशांत सिनकर यांनी ‘ठाणे खाडी’ हा विषय घेऊन त्याची सखोल माहिती दिली होती. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी चर्चेत भाग घेऊन खाडी संवर्धनाविषयी सखोल मार्गदर्शन केले होते. या पुरस्कारांमध्ये जीवन गौरव, वने इको टुरिझम, पर्यावरण, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक, ग्रामीण विकास, धार्मिक, सामाजिक, राजकीय गुन्हेगारी वृत्त आदी विविध प्रकारात वेब संवादाद्वारे समस्यांची उकल करण्यात आली होती. राज्यभरातून या पुरस्कारासाठी अनेक नामांकने आली होती. या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. प्रशांत सिनकर यांना याआधी महाराष्ट्र शासनाचा शि. म. परांजपे पुरस्कार, नेपाळ सरकारचा नेपाळ इको-२०१३, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण’, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन, ठाणे गौरव सारस्वत चैतन्य, रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टचा व्होकेशनल एक्सलन्स असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading