वाहतूक पोलीसांच्या वतीने पोलीस कर्तव्य बजावत असताना उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीसांचा सन्मान

वाहतूक पोलीसांच्या वतीने पोलीस कर्तव्य बजावत असताना उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीसांना सन्मानित करण्यात आलं. वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत असताना जखमी व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात नेणे, हरवलेल्या व्यक्तीला घरी सोडणे, प्रवासात हरवलेला किमती ऐवज, महत्वाची कागदपत्रं संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचवणे अशा उल्लेखनीय २२ घटनांमधील ४० पोलीसांना सन्मानित करण्यात आलं. नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणा-या कर्तव्यदक्ष पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून त्यांचा सन्मान केला जातो. कोळसेवाडी वाहतूक विभागात दुचाकीस्वाराने एका पादचा-याला धडक दिली. या अपघातात दोघेही जखमी झाले होते. त्यावेळी तेथील वाहतूक पोलीसांनी त्वरीत मदतीसाठी धावून त्यांना रूग्णालयात दाखल केलं. खारेगाव टोल नाक्यावर एका व्यक्तीने खाडीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती समजताच वाहतूक पोलीसांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले होते. तसंच कोपरी वाहतूक शाखेच्या हद्दीत ठाणे ते कोर्टनाका असा रिक्षाने प्रवास करताना प्रवाशाची एक लाख रूपये किंमतीची अंगठी रिक्षात पडली होती. त्यावेळी पोलीसांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन अंगठी परत मिळवून दिली. अशाप्रकारे पोलीसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आलं.

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading