जबरी चोरी झाल्याचा बनाव करून ५ लाख रूपयांची रोकड लंपास करणा-यास अटक

जबरी चोरी झाल्याचा बनाव करून ५ लाख रूपयांची रोकड लंपास करणा-यास पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी चितळसर पोलीसांनी वैभव शिंदे याला अटक करून त्याच्याकडून ५ लाखांची रोकडही हस्तगत केली आहे. नवनीत नेटवर्क सोल्यूशन्स या कंपनीची ५ लाखांची रोकड बँक ऑफ बडोदामधून काढून वैभव शिंदे हा दुचाकीवरून जात होता. त्यावेळी कापुरबावडी येथे चार अनोळखी व्यक्तींनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील रक्कम जबरीने लुटल्याची तक्रार त्याने चितळसर पोलीसांकडे केली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही चित्रण पाहिले. या चित्रणावरून पोलीसांना खात्री पटली नाही. आणि वैद्यकीय अहवलातही त्याच्या डोळ्यात कोणत्याही प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आढळला नाही. पोलीसांनी आणखी तपास केला असता त्याने जबरी चोरी झाल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याकडून ५ लाखांची रक्कम हस्तगत केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading