पक्ष्यांना जंक फूड खायला घालू नये यासाठी मासुंदा तलाव परिसरात जनजागृती

पक्ष्यांना जंक फूड खायला घालू नये यासाठी मासुंदा तलाव परिसरात जनजागृती करण्यात आली. पक्ष्यांना ब्रेड, बिस्कीट सारखं अन्न भूतदयेपोटी खायला घातलं जातं. यामुळं पक्ष्यांची जीवनशैली बिघडते. त्यांना आयतं खाण्याची सवय लागते. ब्रेड, बिस्कीट हे त्यांचं नेहमीचं अन्न नसल्यामुळं त्यांच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो. म्हणून सर्वसामान्यांमध्ये याबाबत येऊरच्या एका सामाजिक संस्थेतर्फे जनजागृती करण्यात आली. पक्ष्यांना जंक फूड खायला घालू नये, त्यामुळे कसे दुष्परिणाम होतात हे या सामाजिक कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न केला. थंडीपासून बचावासाठी अनेक परदेशी पक्षी हे पाणवठ्याच्या ठिकाणी येत असतात. सध्या मासुंदा तलावावर सि-गल पक्षी आले असून या पार्श्वभूमीवर ही जनजागृती करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading