पेट्रोलच्या भावानं १०० रूपयांचा टप्पा गाठल्याचा अनोखा निषेध

पेट्रोलच्या भावानं १०० रूपयांचा टप्पा गाठल्याचा अनोखा निषेध ठाण्यात करण्यात आला. ठाण्यामध्ये पॉवर पेट्रोलच्या दरानं १०१ रूपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोलचे भाव जवळपास रोज वाढत असून याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर तुलनात्मकरित्या कमी असतानाही करांच्या ओझ्यामुळे पेट्रोलचे दर देशामध्ये गगनाला भिडले आहेत. राज्य आणि केंद्राच्या असलेल्या करांमुळे हे दर गगनाला भिडले आहेत. करांची टक्केवारी कमी केल्यास यातून काहीसा फायदा ग्राहकांना होऊ शकतो. पण राज्य आणि केंद्र दोन्ही आपापले कर कायम ठेवून आहेत. पेट्रोलच्या दरानं १०० चा टप्पा पार केल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेंच्युरीची ट्रॉफी पाठवण्यात आली. ठाण्यातील तीन पेट्रोल पंपाचे मालक राजू मुंदडा यांना ही ट्रॉफी पंतप्रधानांकडे पाठवण्यासाठी प्रदान करण्यात आली आणि पेट्रोल दरवाढीचा अनोखा निषेध करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading