नौपाड्यातील एका जुन्या झाडाची फांदी पडल्यामुळं ४ जण जखमी

नौपाड्यातील एका जुन्या झाडाची फांदी पडल्यामुळं ४ जण जखमी होण्याचा प्रकार काल घडला आहे. ठाण्यातील प्रसिध्द हस्तकला दुकानाच्या बाजूला असलेल्या या झाडाची फांदी काल कोसळली. यामध्ये एक ४७ वर्षाची महिला आणि इतर तिघेजण जखमी झाले. जया बंगेरा यामध्ये जखमी झाल्या आहेत. त्या आपल्या पतीबरोबर दुचाकीवरून जात असताना हा प्रकार घडला. त्यांचे पती संदीपही यात जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबर २३ वर्षाचा एक रिक्षा चालक आणि ३३ वर्षाची रस्त्यावरून चालणारी एक व्यक्ती जखमी झाली आहे. बंगेरा दाम्पत्याला पराडकर रूग्णालयात तर रिक्षा चालकाला गोडबोले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading