शिवसेनेच्या वतीनं दिवाळी बाजारचं आयोजन

महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी शिवसेनेच्या वतीनं दिवाळी बाजारचं आयोजन करण्यात आलं आहे. पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतन समोरील रस्त्यावर हा दिवाळी बाजार आयोजित करण्यात आला आहे. नगरसेविका रूचिता मोरे आणि राजेश मोरे यांच्या वतीनं बचत गटातील सुगरण आणि गरजू महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी बनवलेल्या रूचकर आणि खुसखुशीत चकली, चिवडा, करंजी, अनारसे, लाडू, दिवाळी कंदिल, पणत्या, उटणे अशा विविध साहित्याची विक्री या बाजारात होत आहे. उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते या दिवाळी बाजाराचं उद्घाटन झालं. बचत गटातील या महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी येऊन खरेदी करावी असं आवाहन राजेश मोरे यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading