कोरोना काळातही तयार फराळाला युरोप-अमेरिकेतूनही मोठी मागणी

दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच आणि अलिकडे तर फराळ घरी बनतच नाही. पण यंदा कोरोनामय वातावरण असल्यामुळं बाहेरच्या फराळाला उठाव असेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र वसंतविहारमधील मेधा देशपांडे यांना उलट अनुभव आला असून त्यांनी घरी तयार केलेल्या फराळाला मोठी मागणी मिळाली आहे. अगदी ठाण्यातून नव्हे तर परदेशातूनही या फराळाला मोठी मागणी आहे. आत्तापर्यंत त्यांचा फराळ अमेरिकेत जात होता. पण यंदा मात्र युरोपमधूनही मोठी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. जर्मनी, आर्यलंड, इग्लंड, युएई अशा विविध देशातून त्यांच्या फराळाला मोठी मागणी होती. यंदा कोरोना असल्यामुळं शासनानंही अनेक परवानग्या बंधनकारक केल्या होत्या. या सर्व परवानग्या घेऊन मेधा देशपांडे यांनी हा फराळ परदेशात पाठवला आहे. परदेशात पाठवण्यासाठी त्याच्या पॅकींगचीही विशेष काळजी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading