नौपाडा भागात एका ईमारतीचा ढीगारा कोसळून दोन कामगारांचा दूदैवी मृत्यू

नौपाडा भागात एका ईमारतीचा ढीगारा कोसळून दोन कामगारांचा दूदैवी मृत्यू झाला. नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जेसीबी ने माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्या खाली 3 कामगार अडकले. तात्काळ ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही वेळातच ढिगारा बाजूला केल्यावर त्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले तर एक जण गंभीर जखमी आढळला त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. या दूर्घटनेत हबीब आणि रणजीत या दोघांचा मृत्यू झाला. तर निर्मल राव यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading