सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच अनोखे आंदोलन

सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय कार्यवाहीचा निषेध व्यक्त करत ,आज ठाणे मंडळ अंतर्गत सर्व सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांनी अनोखे आंदोलन केलेले पाहायला मिळाले. यावेळी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग परिमंडळ यांच्या ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद कार्यालया बाहेर, शासन नियम आणि निर्णयानुसार कारवाई करत नसल्याने सर्व सेवानिवृत्त 60 ते 85 वयोगटातील कर्मचारी अर्ध नग्न मुखउपोषण तर ,महिला कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या त्यांच्या विधवा पत्नी केवळ मुक उपोषण करत या भ्रष्ट कारवाईचा निषेध व्यक्त केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading