नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ

कल्याण लोकसभा मतदार संघातील नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशन, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे तसेच रामचंद्र मढवी यांच्या स्मरणार्थ फिरता दवाखान्याचे लोकार्पण कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या फिरत्या दवाखान्यामध्ये रुग्णांच्या तपासणीकरिता डॉक्टर आणि परिचारिका असून तपासणीनंतर लागणारी औषधे दिली जाणार आहेत. कोरोना काळातील निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये याकरिता श्रीकांत शिंदे यांनी “धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना” उपक्रमाचे आयोजन केले आहे. फिरता दवाखाना म्हणजेच प्रत्येक गावांमध्ये जाऊन दारोदारी आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. हे उपक्रम युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं सुरू करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading