नितीन लांडगे यांची ठाणे-धाराशिव लोकसभा युवासेना अध्यक्षपदी नियुक्ती

युवा सेना ठाणे व धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी ठाण्यातील उच्चविद्याविभुषित नितीन सुबराव लांडगे यांची करण्यात आली. लांडगे यांच्या नियुक्ती  ठाणे आणि धाराशिवमधील तरुण युवा कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे अभिनंदन केले.
नितीन लांडगे हे अनेक वर्षे ठाणे आणि धाराशिव विभागासाठी युवा सेनेत कार्यरत आहेत. धाराशिव युवा सेना संपर्कप्रमुखपदी काम करताना धाराशिवमधील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशासकीय कामकाजासाठी लांडगे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ठाणे आणि धाराशिवमध्ये तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात लांडगे सतत अग्रेसर असतात. घोडबंदर रोडवरील टिकुजिनीवाडी, धर्मवीरनगर, कृष्णानगर, वाघबीळ, कावेसर, कासारवडवली सारख्या डोंगरी आणि खाडी पट्टयात लांडगे यांचे कार्य ठाणेकरांना चांगलेच परिचित आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रवक्ते नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनाप्रमुख पुुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने, सामाजिक उपक्रमात नितीन लांडगे स्वतः पुढाकार घेत परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविणे, तरुणांना रोजगार, स्वयांरोजगार, व्यवसायाभिमुख मार्गदर्शन शिबीरे राबवून  उच्चशिक्षित पिढी घडविण्यासाठी आणि शिवसेना संघटना वाढविण्यासाठी लांडगे यांचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याने ठाणे – धाराशिव युवा सेना लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading