नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांची पाहणी तसेच नालेसफाई कामाची पाहणी करताना पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हे आदेश दिले. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत, परंतु पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईचे काम देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हा पाहणी दौरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निविदा मागवून प्रभाग समितीनिहाय कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील नालेसफाई कामाचा वेग वाढला असून शहरातील सर्व नाल्यांची खोलवर सफाई करून संपूर्ण गाळ काढण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. यावेळी आयुक्तांनी वंदना, पनामा, मुलुंड चेकनाका, ब्राडमा, आयटीआय सर्कल, लक्ष्मी पार्क, कोरम नाला, बटाटा कंपनी आदी नाल्यांची पाहणी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading