मुंबई-नवी मुंबई शहरात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिव्यात थर्मल गनद्वारे तपासणी

दिवा येथून मुंबई आणि नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या सर्वांची रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दिवा येथून मुंबई- नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी टिएमटी, खाजगी बस, कार, रिक्षाने जाणा-या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांची दिव्यातील नॅशनल स्कूल येथे रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांची संपूर्ण माहिती नोंद वहीत घेण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading