नागरिक आकलन सर्वेक्षण उपक्रमाला हॉटेलमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे स्मार्टसिटीच्या नागरिक आकलन सर्वेक्षणातंर्गत शहरातील नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध हॉटेल्समधील टेबलवर ‘नागरिक आकलन सर्वेक्षण’ उपक्रमाची माहिती पत्रिका ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाला ठाण्यातील सर्वच हॉटेलमालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी उपक्रमात नागरिकांना सामावून घेण्यासाठी महापालिकेच्या ठाणे स्मार्टसिटीअंतर्गत विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहे. पथनाट्य, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, शहरात होर्डिंग्जच्या माध्यमातून प्रसिद्धी, घंटागाड्यांद्वारे जिंगल्स आदी प्रकारे जनजागृती सुरू आहे. शहरातील नागरिक हे खवय्येगिरीसाठी हॉटेल्समध्ये जात असतात, या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना ‘नागरिक आकलन सर्वेक्षण’बाबत माहिती मिळावी तसंच या उपक्रमात सहभागी होता यावे यासाठी क्यूआरकोड देण्यात आला आहे. या क्यूआर कोडवर स्कॅन केल्यानंतर सर्व माहिती नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाला हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठाणेकर या नागरिक आकलन सर्वेक्षणमध्ये सहभागी होत आहेत. तसेच जास्तीत जास्त ठाणेकरांनी या सर्वेक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading